फिर्यादी कोल्हापूरला जाण्यासाठी लाल रंगाच्या बलेनो गाडीत बसले होते. नवले ब्रिजजवळ गाडी पुढे गेल्यानंतर या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी हत्याराच्या मुठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याजवळील २ हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.
या प्रकरणी वडगाव बुद्रुक पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम अधिक तपास करत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #HighwayRobbery #RobberyOnHighway #VadgaonBudrukPolice #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा