पिंपरी चिंचवड: चाकण परिसरात एकाने लोखंडी गजाने भोसकून एका ६२ वर्षीय वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी फिर्यादी तुकाराम दत्तात्रय पानसरे (वय ३८ वर्षे, रा. चांदणी चौक, पानसरे वस्ती, बहुळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी दशरथ गुलाब पानसरे (वय ४४ वर्षे, रा. चांदणी चौक, पानसरे वस्ती, बहुळ, ता. खेड, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
दि. ०६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८:३० वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक, पानसरे वस्ती, बहुळ येथे ही घटना घडली. फिर्यादीची पत्नी आणि आरोपीची आई यांच्यात काहीतरी शिकवण्यावरून वाद झाला. या वादातून आरोपी दशरथ पानसरे याने फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात लोखंडी गज खुपसण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने डावा हात पुढे केल्याने त्याला हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी फिर्यादीचे वडील दत्तात्रय पानसरे (वय ६२ वर्षे) हे त्यांना सोडवण्यासाठी गेले असता, आरोपीने त्यांच्या छातीत मधोमध लोखंडी गज खुपसून त्यांना जीवे ठार मारले.
या प्रकरणी चाकण स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३७२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) (खुनाचा गुन्हा), १०९ (गुन्हेगारी कट), ३५२ (गैरहल्ला) आणि ३५१ (२) (जबरदस्ती) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपनिरीक्षक सुकाळे करत आहेत.
- --------------------------------------------------------------------------------------------------------------- Crime, Murder, Assault, Dispute, Pimpri Chinchwad, Chakan, Arrest
- Murder, #ChakanCrime, #PimpriChinchwad, #Assault, #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: