भागीदारीचे स्वरूप: या भागीदारी अंतर्गत, GMJ च्या हरिप्रेम फिल्म्स द्वारे मामे खान यांचे YouTube वरील स्थान आणि डिजिटल हक्कांचे विशेष व्यवस्थापन केले जाईल. त्यांच्या सर्व आगामी संगीत रिलीझेस, सिंगल सॉंग डील्स आणि सहयोग प्रकल्प HPF द्वारे हाताळले जातील. जरी मामे खान काही निवडक बाह्य भागीदारांसोबत काम करत असले तरी HPF हा डिजिटल आशय, ब्रँडेड मोहिमा आणि कलाकार व्यवस्थापन उपक्रमांसाठी त्यांचा प्राथमिक प्रतिनिधी असेल.
या भागीदारीत मामे खान यांच्या दोन प्रमुख लाईव्ह अॅक्ट्स – प्रसिद्ध बँड रॉकएनरूट्स प्रोजेक्ट (नऊ सदस्यीय बँड) आणि ४० हून अधिक संगीतकार असलेले द फोक ऑर्केस्ट्रा यांचे सादरीकरण व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे. GMJ चे HPF मामे खान यांच्या 'द फोक ऑर्केस्ट्रा ऑफ राजस्थान' च्या भारतातील आणि परदेशातील सर्व बुकिंग्ज आणि शो विक्री हाताळेल तसेच 'रॉकएनरूट्स प्रोजेक्ट' साठी आंतरराष्ट्रीय सादरीकरणांचेही व्यवस्थापन करेल.
मामे खान आणि जेटसिन्थेसिसच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया: मामे खान म्हणाले, “लोकसंगीतातून नेहमीच गोष्ट सांगितली जाते आणि संबंध निर्माण केले जातात. जेटसिन्थेसिसच्या GMJ आणि HPF सोबत मला असा सहयोगी मिळाला आहे ज्याला यातली खरी ओढ समजते आणि आजच्या डिजिटल-प्रथम युगात याचा उपयोग अधिक व्यापक कसा करायचा याची बरोबर जाण आहे. ही भागीदारी केवळ वाढीसाठी नाही, तर लोकसंगीताचे सार जपण्यासाठी आणि नवीन आणि सर्जनशील पद्धतीने ते साजरे करण्यासाठी आहे.”
जेटसिन्थेसिसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नवानी म्हणाले, “ग्लोबल म्युझिक जंक्शन मध्ये आमचे उद्दिष्ट भारताच्या समृद्ध संगीत परंपरेला आजच्या जागतिक प्रेक्षकांशी जोडणे आहे. मामे खान हे परंपरा आणि आधुनिकतेचा परिपूर्ण संगम आहेत. ते त्यांच्या मुळाशी प्रामाणिक राहून आधुनिक प्रेक्षकांशी सहज जोडले जातात. आम्हाला त्यांच्या सोबत काम करताना आनंद होत आहे आणि त्यांचे संगीत जगभरातील अधिक मोठ्या मंचांवर आणि विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
ग्लोबल म्युझिक जंक्शनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार सिंग म्हणाले, “GMJ मध्ये आम्ही या भागीदारीला डेटा, डिजिटल स्केल आणि खोलवर कहाणी सांगण्याच्या आधारावर पारंपरिक भारतीय संगीताला जगासमोर नव्याने सादर करण्याची एक सक्षम संधी मानतो. त्यांचा कालातीत आवाज आणि जागतिक व्यासपीठ यांचा संगम घडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यायोगे लोकसंगीत केवळ सुसंगतच नव्हे तर नवीन पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
वॉर्नर म्युझिक इंडिया आणि SAARC चे व्यवस्थापकीय संचालक जय मेहता म्हणाले, “ग्लोबल म्युझिक जंक्शनच्या माध्यमातून मामे खानसोबतची भागीदारी ही भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे जागतिकीकरण करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या संपूर्ण सेवा धोरणावर भर देत असताना हा सहयोग संगीत, लाईव्ह आणि ब्रँड क्षेत्रातील कलाकारांना सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयाला बळकट करतो आणि त्याचबरोबर ते प्रतिनिधित्व करत असलेल्या संस्कृतीशी घट्ट नाते टिकवून ठेवतो.”
हरीप्रेम फिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन समाधिया म्हणाले, “जेटसिन्थेसिस, वॉर्नर म्युझिक आणि ग्लोबल म्युझिक जंक्शन या प्रभावी परिसंस्थेच्या पाठबळासह ही भागीदारी राजस्थानच्या तेजस्वी, जिवंत स्वरांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक अर्थपूर्ण पाऊल आहे. आम्ही एकत्रितपणे भारताच्या समृद्ध लोकपरंपरांना उंचीवर नेण्याचा आणि राजस्थानी संगीताच्या आत्म्याचा आवाज आणि कालातीत कथा जागतिक प्रेक्षकांच्या हृदयात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही भागीदारी केवळ संगीतापुरती मर्यादित नाही तर ती सांस्कृतिक जतन, सखोल संबंध आणि भारताच्या कलात्मक वारशाचा जागतिक व्यासपीठावर साजरा करण्याचा उत्सव आहे.”
GMJ ची मामे खानसोबतची भागीदारी ही भारतीय कलाकारांसाठी, विशेषतः लोकसंगीत आणि प्रादेशिक संगीत क्षेत्रातील कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून वाढत्या गतीला चालना देते. GMJ कडे सोनू निगम आणि शान यांसारख्या मुख्य प्रवाहातील प्रसिद्ध गायकांचे तसेच हरियाणवी गायिका सपना चौधरी यांसारख्या प्रादेशिक कलाकारांचे संगीत आहे. आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रातील महाकाय कंपनी वॉर्नर म्युझिक इंडिया कडून मिळालेल्या धोरणात्मक गुंतवणुकीच्या आधारावर, GMJ एक कलाकार-केंद्रित दृष्टिकोन सादर करते. या दृष्टिकोनाच्या आधारावर सर्जनशील स्वातंत्र्याला सक्षम पायाभूत सुविधा आणि जागतिक व्याप्ती यासोबत जोडले जाते. त्यायोगे भारतीय संगीतकारांना जागतिक स्तरावर प्रगती करायला मदत मिळते.
JetSynthesys, Global Music Junction (GMJ), Mame Khan, Folk Music, Indian Music, Warner Music India, Hari Prem Films (HPF), YouTube, Digital Rights, RocknRoots Project, The Folk Orchestra of Rajasthan, Rajan Navani, Rajkumar Singh, Jay Mehta, Nitin Samadhiya, Artist Management, International Performances, Cultural Preservation.
#MameKhan #GlobalMusicJunction #JetSynthesys #FolkMusic #IndianMusic #WarnerMusicIndia #DigitalRights #CulturalHeritage #MusicPartnership #Pune
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२५ ०६:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: