पुनाडे येथे नेत्रचिकित्सा शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद

 


उरण, दि. २३ जून २०२५ : उरण तालुक्यातील पुनाडे गावाचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील आणि डोळ्यांचे डॉक्टर दिक्षा अनिकेत डाकी, अनिकेत कृष्णा डाकी, तसेच प्रसिद्ध जागतिक नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदिपुरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पुनाडे गावातील तसेच पंचक्रोशीतील गरजू आणि गरीब लोकांसाठी पुनाडे गावातील हनुमान मंदिर येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे अल्प दरात आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेतला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे रमेश म्हात्रे (संपर्क प्रमुख उरण विधानसभा), नेत्र चिकित्सा तज्ञ डॉ. श्रध्दा मामीदवार, डॉ. दिक्षा अनिकेत डाकी, शिबिराचे संयोजक विनोद पाचगेर, उपोषण सम्राट अजित म्हात्रे, काशीबाई खारपाटील (चिरनेर), जयप्रकाश यादव, अॅड. रुषाली पाटील, कृष्णा डाकी, सुरेंद्र पाटील, रंजित ठाकूर, हरिश्चंद्र पाटील (केळवणे), देविदास पाटील (पुनाडे), स्वागत म्हात्रे, जीवन पाटील (सारडे), लीलाबाई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र पाटील यांचे सामाजिक कार्य: पुनाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील हे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. सामाजिक बांधिलकी जपत ते नेहमी पुनाडे गावासाठी सातत्याने सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. पुनाडे गावातील गोरगरीब जनतेसाठी देवेंद्र पाटील यांनी जणू काही मदतीचा सपाटाच लावला आहे. या सात-आठ वर्षात त्यांनी पुनाडे ग्रामस्थांसाठी छत्री वाटप कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मराठी शाळेसाठी फॅन, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम घेतले आहेत. तसेच सलग पाच वर्षे पुनाडे गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात देवेंद्र पाटील आणि मित्र परिवार साजरा करत असतात.

त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून डॉ. दिक्षा अनिकेत डाकी हिने पुनाडे गावातील लोकांसाठी या नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. उरण तालुक्यात पुनाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील आणि डॉ. दिक्षा डाकी यांनी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Uran, Punade, Eye Camp, Netra Chikitsa Shibira, Devendra Atmaram Patil, Dr. Diksha Aniket Daki, Aniket Krishna Daki, Dr. Suhas Haldipurkar, Laxmi Charitable Trust Panvel, Hanuman Mandir, Ramesh Mhatre, Shiv Sena Shinde Group, Social Worker, Community Service, Charity. 

#Uran #Punade #EyeCamp #CharitableTrust #SocialWork #CommunityService #Healthcare #Maharashtra

पुनाडे येथे नेत्रचिकित्सा शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद पुनाडे येथे नेत्रचिकित्सा शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद Reviewed by ANN news network on ६/२३/२०२५ ०६:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".