कोप्रोली ते श्री क्षेत्र कार्ला बाईक रॅली उत्साहात

 


उरण, दि. २३ जून २०२५: मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवर आगरी, कोळी, कराडी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून, या समाजाचे आराध्य दैवत म्हणून लोणावळा तालुक्यातील श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. अडीअडचणीत आई एकविरा भाविक भक्तांच्या पाठीशी सदैव उभी असते अशी भाविक भक्तांची व आगरी, कोळी, कराडी समाजाची दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे या समाजातील व्यक्ती नेहमी श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा माता मंदिर येथे जाऊन आई एकविरेचे दर्शन घेऊन नतमस्तक होत असतात.

रायगड जिल्ह्यात, विशेषतः उरण तालुक्यात, आई एकविरेला मानणाऱ्यांची आणि पूजा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आई एकविरा मातेचे महात्म्य लक्षात घेता, भक्तांना वर्षातून एकदा तरी वारी करण्याच्या दृष्टीने दरवर्षी पावसाळ्यात बाईक रॅली काढली जाते. कोप्रोली गावातील आई एकविरा मातेचे भक्त देवीचंद म्हात्रे यांनी सन २०२२ मध्ये या रॅलीची सर्वप्रथम सुरुवात केली होती. सन २०२२ मध्ये सुरू झालेली ही रॅली आजही अखंडितपणे तेवढ्याच श्रद्धेने आणि तेवढ्याच जोमाने सुरू आहे. आजपर्यंत या बाईक रॅलीला आई एकविरा मातेच्या कृपेने कोणतेही गालबोट लागले नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, कोणालाही त्रास न देता बाईक रॅली काढली जाते हे या बाईक रॅलीचे खास वैशिष्ट्य आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार, २२ जून २०२५ रोजी कोप्रोली (उरण) ते श्री क्षेत्र कार्ला (लोणावळा) या मार्गावर  बाईक रॅली काढण्यात आली. कोप्रोली गावचे भक्त देवीचंद म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाविक भक्तांना या रॅलीतून वेगळाच आनंद आणि समाधान भेटले असल्याचे रॅलीत सहभागी भाविक भक्तांनी सांगितले. दरवर्षी बाईक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांची संख्या वाढतच आहे. यंदा बाईक रॅलीचे चौथे वर्ष आहे.

रॅलीचे स्वरूप: 

यंदा रविवार, २२ जून २०२५ रोजी कोप्रोली गावातून बाईक रॅली निघाली असून, सकाळी ६:३० वाजता कोप्रोली (उरण) मधील आई एकविरा मंदिरात आरती झाली. सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन रॅलीला प्रारंभ झाला. कलोते येथे नाश्ता झाला, त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा मातेचे दर्शन, दुपारी भोजन आणि एकविरा मंदिराच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. सायंकाळी ठीक ४ वाजता परतीचा प्रवास सुरू होऊन रॅली सुखरूप  झाली.

'मी एकविरा प्रेमी' बाईक रॅलीचे हे चौथे वर्ष असून, कोप्रोलीवरून ४०० एकविरा प्रेमी २०० बाईक घेऊन एकविरेला निघाले. मध्ये नाश्त्यासाठी कलोते येथील पेट्रोलपंपावर थांबले. नंतर तिथून थेट एकविरेला पोहोचले. ही बाईक रॅली दरवर्षी एकदम शिस्तबद्ध निघते. या रॅलीमध्ये कोणीही दारू पित नाही. एकविरा आईच्या आशीर्वादाने ही बाईक रॅली सुखरूप घरी पोहोचली, असे आयोजक देवीचंद म्हात्रे यांनी सांगितले.

 Koproli, Uran, Karla, Lonavala, Bike Rally, Devi Chand Mhatre, Aai Ekvira Devi, Agri Koli Karadi Community, Devotees, Raigad, Konkan Coast, Spirituality, Discipline, Chhatrapati Shivaji Maharaj, Temple Cleaning. 

 #Koproli #Karla #EkviraDevi #BikeRally #AgriKoliKaradi #Devotion #Maharashtra #Pilgrimage #DevichandMhatre

कोप्रोली ते श्री क्षेत्र कार्ला बाईक रॅली उत्साहात  कोप्रोली  ते श्री क्षेत्र कार्ला  बाईक रॅली उत्साहात Reviewed by ANN news network on ६/२३/२०२५ ०६:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".