नवी दिल्ली: भारताच्या संविधानाची उद्देशिका (Preamble) हा संविधानाचा आत्माच असून, आणीबाणीच्या काळात त्यात नव्याने शब्द घातले गेल्यामुळे उद्देशिकेची विटंबना झाली, असे परखड मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.
उपराष्ट्रपती धनखड यांनी यावेळी टीका केली की, राज्यघटनेची उद्देशिका बदलला गेलेला भारत हा जगातील एकमेव देश असेल. घटना समितीने अत्यंत गांभीर्याने तयार केलेली उद्देशिका, बेचाळिसाव्या घटनादुरुस्तीच्या वेळी बेफिकीर वृत्तीने आणि अनुचित पद्धतीने बदलण्यात आली, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपराष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. ते म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांच्या हृदयात राहतात, आपल्या मनांवर त्यांचे अधिराज्य आहे आणि आपल्या आत्म्याला ते स्पर्श करतात."
Jagdeep Dhankhar, Vice President of India, Constitution of India, Preamble, Emergency Period, 42nd Amendment, Dr. Babasaheb Ambedkar, Constitutional Values, Political Criticism
#JagdeepDhankhar #IndianConstitution #Preamble #EmergencyEra #42ndAmendment #BabasahebAmbedkar #ConstitutionalDebate #VicePresident #NewDelhi #IndianPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: