पुणे: पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागात वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री व्यंकटेश वृंदावन सोसायटी, नवले ब्रिजजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे येथील गेटपासून उजव्या बाजूस ५० मीटरपर्यंत 'नो पार्किंग' झोन जाहीर करण्यात आला आहे. ११ जून २०२५ रोजी वाहतूक शाखेने यासंदर्भात अंतिम आदेश निर्गमित केला आहे.
शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सीआर- ३७/टीआरए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटिफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश दिला आहे. यापूर्वी पार्किंगबाबत असलेले सर्व निर्बंध आता रद्द समजण्यात येतील.
हा आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (उदा. फायरब्रिगेड, वाहतूक वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) लागू नाही. पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी फलक बसवून सात दिवसांच्या आत पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रेस नोटची प्रसिद्धी सर्व वर्तमानपत्रांमध्ये करावी आणि पुणे वाहतूक पोलीस वेबसाइट व सोशल मीडियावर (फेसबुक/ट्विटर) अपलोड करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- --------------------------------------------------------------------------------------------------------------------- Traffic Regulation, No Parking, Pune, Sinhagad Road, Traffic Police, Public Notice
- #PuneTraffic, #NoParking, #SinhagadRoad, #TrafficPolice, #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: