राहुरी दि. २० जून: राहुरी तालुक्याचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना आज (२० जून) एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. अहिल्यानगर शहरात ही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील पंचायत समिती प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन महिन्यांपूर्वी एका ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी मुंडे यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर महिन्याभरापूर्वीच संबंधित ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची कामे मार्गी लावण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अहिल्यानगर येथील अँटीकरप्शन विभागाने या प्रकरणी कारवाई करत मुंडे यांना ताब्यात घेतले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणाविषयी अधिकृत आणि सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
------------------------------------------------------------------------------------------------
Rahuri, BDO, Sudhakar Munde, Bribery, ACB, Ahilya Nagar, Panchayat Samiti, Gramsevak, Corruption
#Rahuri #ACB #Bribery #Corruption #SudhakarMunde #PanchayatSamiti #MaharashtraNews
Reviewed by ANN news network
on
६/२०/२०२५ ०५:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: