पिंपरी, २० जून २०२५: पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज (२० जून २०२५) पहाटे ४ वाजता आकुर्डी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन आणि आरती करण्यात आली. या भक्तिमय वातावरणात आषाढी वारी सोहळ्याला आणखी पावित्र्य लाभले.
दर्शन आणि पूजेनंतर आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसदस्य प्रमोद कुटे, कुंडलीक महाराज मोरे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सह शहर अभियंता नितीन देशमुख, उप आयुक्त सचिन पवार, क्षेत्रिय अधिकारी निवेदिता घार्गे, अतुल पाटील, किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष कुटे, प्रवीण कुटे, तुकाराम कुटे, गिरीश कुटे तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
महापुजेनंतर 'विठुनामाच्या' गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान केले. पिंपरी-चिंचवडमधून पालखीचा प्रवास उत्साहात पार पडल्याने वारकरी संप्रदायामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Sant Tukaram Maharaj Palkhi, Pimpri-Chinchwad, Shekhar Singh, Palkhi Sohala, Vitthal Rakhumai Mandir, Akurdi, Wari, Devotional Ceremony
#SantTukaramPalkhi #PimpriChinchwad #ShekharSingh #Akurdi #Wari #PalkhiSohala #VitthalRakhumai

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: