पिंपरी चिंचवड: पिंपळे गुरव येथील शिवदत्तनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर पार्क केलेल्या गाडीची सिमेंट ब्लॉकने तोडफोड करण्यात आली. तसेच, आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाला धमकावून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी फिर्यादी मनिष गोविंद राठी (वय ४३ वर्षे, धंदा बांधकाम व्यवसाय, रा. जगजन अपार्टमेंट, फ्लॅट नं. १५, गंगोत्रीनगर, लेन नं. २, पिंपळे गुरव, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये व्यंकटेश राजेंद्र भोसले, विघ्नेश गुणशिलन रंगम (वय २३ वर्षे, रा. गंगोत्रीनगर लेन न.०३, पिंपळे गुरव, पुणे) आणि अनिकेत उरणकर उर्फ उन्या यांचा समावेश आहे. आरोपी विघ्नेश रंगम याला अटक करण्यात आली आहे.
दि. ०६/०६/२०२५ रोजी दुपारी ०४:३० वाजण्याच्या सुमारास आणि दि. ०८/०६/२०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास शिवदत्तनगर, नयन गोविंद क्लासिक इमारतीच्या पार्किंगमध्ये, गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव येथे ही घटना घडली. फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या बहिणीच्या गावी नांदेड येथे असताना, आरोपी विघ्नेश रंगम याने फिर्यादीच्या ऑफिससमोर पार्क केलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ कार (नंबर एम.एच.१४/डी.टी.०७८६) ची सिमेंटच्या ब्लॉकने तोडफोड केली. त्याने ऑफिसमधील कामगारांना 'तुझा मालक माझ्याकडे, व्यंकटेश भोसले व अनिकेतकडे बघत नाही, आम्हाला खाऊ पिऊ घालत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा' असे म्हणत शिवीगाळ केली. दि. ०८/०६/२०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास आरोपी व्यंकटेश भोसले आणि अनिकेत उरणकर हे फिर्यादीच्या ऑफिसवर जाऊन त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली आणि झटापटी करून फिर्यादीच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये व खिशात बळजबरीने हात घालून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी फिर्यादीकडे काम करणारे कामगार त्यांना समजावून सांगत असताना, त्या दोघांनी शिवीगाळ व दमदाटी केली. भांडणाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा होऊ लागल्याने आरोपी व्यंकटेश भोसले आणि अनिकेत उरणकर हे ऑफिसच्या बाहेर येऊन थोड्या अंतरावर थांबलेल्या आरोपी विघ्नेश रंगम याच्याकडे गेले. त्या ठिकाणीही त्या तिघांनी परत फिर्यादीस शिवीगाळ करून 'आम्ही या ठिकाणचे भाई आहोत, तुला व तुझ्या घरातील लोकांना जिवंत सोडणार नाही' असे म्हणत परिसरात जोरजोराने आरडाओरडा करून हातवारे करू लागले, त्यामुळे परिसरातील लोक दहशतीने आपापल्या घरात दरवाजा लावून बसले.
या प्रकरणी सांगवी स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १८६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (४) (गंभीर दुखापत), ३२४ (४) (शस्त्राने दुखापत), ३५२ (गैरहल्ला), ३५१ (२) (हल्ला), ३ (४) (गुन्हेगारी कट), महाराष्ट्र अधिनियम कलम १४२, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नारायण पाटील करत आहेत.
- ---------------------------------------------------------------------------------------------------------------------Crime, Vandalism, Extortion, Assault, Pimpri Chinchwad, Sangvi, Arrest
- #PimpriChinchwadCrime, #Vandalism, #Extortion, #Assault, #Sangvi
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२५ ०८:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: