पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ ने ११ जून रोजी बंडगार्डन रेल्वे स्टेशन परिसरातून पुणे येथील एका नामांकित सोन्याच्या पेढीच्या शोरूममधून ६९ लाख रुपये किमतीचे ७४० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. राजस्थानमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार, रूपसिंग गुलाब सिंह रावत (वय ३१, रा. देलरा, थाना दिवेर, तहसील अमीठ, जिल्हा राजसमद, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १८ लाख ६६ हजार रुपये किमतीचे २४९.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी भा.न्या.सं.क. ३०९ (४) आर्म अॅक्ट कलम ३(२४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट ०२ च्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करत असताना, ही चोरी रूपसिंग गुलाब सिंह रावत आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी परराज्यातील रेकॉर्डवरील असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, गुन्हे शाखा युनिट ०२ च्या पथकाने गोपनीय माहिती आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने राजस्थानात जाऊन त्याला २६ जून रोजी दिवेर, राजस्थान येथून अटक केली.
ही कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, उप आयुक्त, आर्थिक व सायबर (गुन्हे) विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, अंमलदार संजय जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, ओमकार कुंभार, अमोल सरडे, विनोद चव्हाण, नागेश राख, पुष्पेन्द्र चव्हाण, संतोष टकले आणि विजय पवार, संजय आबनावे यांनी केली.
Crime News, Pune Police, Robbery Arrest, Gold Theft
#PunePolice #CrimeNews #GoldTheft #RobberyArrest #BundGarden #Rajasthan #CrimeUnit2 #MaharashtraPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: