पुणे - पुणे महानगरपालिकेने नागरिकांना आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेविषयी पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की सध्या प्रभाग रचनेचे काम प्राथमिक टप्प्यात असून, यावेळी पसरत असल्या अनेक बातम्यांमध्ये तथ्य नाही. नागरिकांनी प्रभाग रचनेबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे. निवडणुकीची अधिकृत माहिती पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने जून महिन्यात तीन वेळा आदेश निर्गमित करून राज्यभरातील महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेत हे काम प्राथमिक स्तरावर सुरू झाले आहे.
सध्या शहर जनगणना कार्यालयाकडून मिळालेली लोकसंख्या, प्रगणक गट यांसारखी माहिती तपासणे आणि स्थळ पाहणी करण्याचे काम सुरू आहे. लवकरच प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर सुनावणी घेवून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
महानगरपालिकेने सांगितले आहे की प्रभाग रचनेचे काम गोपनीय स्वरूपाचे असते. मात्र काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. EB Mapping चे काम अद्याप सुरू झालेले नसतानाही अशा अफवा पसरवल्या जात आहेत.
- Pune Municipal Corporation
- Election News
- Ward Delimitation
- Political Updates
- Maharashtra Elections
- Local Government
- Public Advisory
#PuneMunicipalCorporation #PuneElections #WardDelimitation #ElectionNews #MaharashtraElections #PMC #LocalElections #PuneNews #MunicipalElections #ElectionProcess

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: