पुणे शहर: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत पाहिजे असलेल्या एका आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले आहे. २९ जून २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रेसनोटनुसार, रुपेश राजन केंद्रे (वय १९, रा. सच्चाईमाता मंदिर, अटल नंबर १३, टॉवर शेजारी जैन मंदिर, कात्रज, पुणे) याला आंबेगाव खुर्द येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ आणि इतर पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत होते.
या पेट्रोलिंग दरम्यान, अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार आणि विजय पवार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे, आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३, १०९, १२६ (२), ३५२, ३ (५) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) ( ), ३ (२) व ३ (४) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रुपेश राजन केंद्रे याचा शोध घेऊन त्याला सच्चाई माता पाण्याचे टाकीजवळ, आंबेगाव खुर्द येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप आयुक्त, आर्थिक व सायबर अति. कार्यभार (गुन्हे) विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, शंकर नेवसे, संजय जाधव, निखिल जाधव, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, ओमकार कुंभार, संजय आबनावे व विशाल भिलारे यांनी केली.
MCOCA, Arrest, Pune Crime Branch, Organized Crime, Wanted Accused, Ambegaon Police Station.
#PunePolice #CrimeBranch #MCOCA #Arrest #OrganizedCrime #PuneCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: