अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; २.०३ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त

 


मुंबई : मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (Anti-Narcotics Cell) घाटकोपर युनिटने घाटकोपर आणि अंधेरी परिसरात मोठी कारवाई करत, तब्बल १.२८ किलो 'मेफेड्रॉन' (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे २.०३ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांच्याकडून अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उघडकीस आणले आहे.

ही कारवाई दिनांक ३१ मे २०२५ रोजी सुरू झालेल्या विशेष मोहिमेचा एक भाग होती. घाटकोपर बस स्टॉपजवळून सुरुवातीला दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यानंतर, त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिसऱ्या आरोपीला अंधेरी पश्चिम, मुंबई येथून अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून ६०५ ग्रॅम 'मेफेड्रॉन' जप्त करण्यात आले.

तपासात अटक आरोपी हे घाटकोपर आणि अंधेरी परिसरात 'मेफेड्रॉन'ची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास घाटकोपर युनिट करत आहे.

बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त  देवेन भारती, पोलीस  आयुक्त (गुन्हे)  लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे)  शैलेश बलकवडे आणि  उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष,  नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली.

नागरिकांना आवाहन: अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत कोणतीही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई येथील इन्फोलाईन क्रमांक ९८१९१११२२२ किंवा नार्कोटीक्स् कंट्रोल ब्युरोची 'मानस' या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक १९३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

---------------------------------------------------------------------------------------------------

Mumbai, Anti-Narcotics Cell, Mephedrone (MD), Drug Bust, Ghatkopar, Andheri, Narcotics Control Bureau, Deven Bharti, Lakhmi Gautam, Shailesh Balkawade, Navnath Dhawale, Drug Trafficking, Infone Line. 

#Mumbai #DrugBust #Mephedrone #AntiNarcoticsCell #MDDrugs #CrimeNews #MumbaiPolice #DrugTrafficking #Ghatkopar #Andheri

अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; २.०३ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; २.०३ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त Reviewed by ANN news network on ६/२१/२०२५ ०२:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".