पुणे-नगर रोडवर गांजा विक्री करणाऱ्याला पकडले; ६.९१ लाखांचा गांजा जप्त

 


पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे यश

पुणे शहर: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने दिनांक २४ जून २०२५ रोजी एका मोठ्या कारवाईत सुमारे १४ किलो गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. आगानगर सोसायटी गेट समोर, पुणे-नगर रोडवर सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, आगानगर सोसायटी गेट समोर, पुणे-नगर रोडवर योगेश रामभाऊ साळवे (वय २५, रा. मु/पो. सोनाई गणेशपेठ, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) हा त्याच्या जवळील स्विफ्ट डिझायर गाडी (क्र. MH 17 BY 1421) मध्ये संशयस्पदरित्या बसलेला आढळून आला.

पोलिसांनी सदर गाडीची झडती घेतली असता, त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये २,८१,७२०/- रुपये किमतीची जांभळ्या रंगाची ट्रॅव्हल बॅग आणि पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या पोत्यामध्ये भरलेले १५ पॅकेट सापडले. यात एकूण १४ किलो ०८६ ग्रॅम वजनाचा गांजा होता. पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत गांजासह स्विफ्ट डिझायर गाडी, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ६,९१,८२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदर आरोपी योगेश रामभाऊ साळवे याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २९७/२०२५ अंतर्गत एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

वरील नमूद कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल दळवी, सचिन माळवे, संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, स्वप्नील मिसाळ यांनी यशस्वीरित्या केली आहे.

Drug Bust, Ganja, NDPS Act, Pune Police, Anti-Narcotics Cell, Arrest. 

 #PunePolice #DrugBust #Ganja #NDPSAct #AntiNarcotics #CrimeNews

पुणे-नगर रोडवर गांजा विक्री करणाऱ्याला पकडले; ६.९१ लाखांचा गांजा जप्त पुणे-नगर रोडवर गांजा विक्री करणाऱ्याला पकडले; ६.९१ लाखांचा गांजा जप्त Reviewed by ANN news network on ६/२५/२०२५ ११:५६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".