पिंपरी-चिंचवड, मावळ, शिरूर मतदारसंघात संघटनात्मक बदल; आगामी निवडणुकांवर लक्ष
पिंपरी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) संघटनात्मक बदल केले आहेत. युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी, चिंचवड विधानसभा) राजेंद्र तरस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवा सेनेच्या या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे, किरण साळी आणि युवासेना सचिव पश्चिम महाराष्ट्र विश्वजीत बारणे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.
नियुक्त्या केलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी:
- युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष (पिंपरी-चिंचवड): राजेंद्र तरस
- युवासेना मावळ लोकसभा (मावळ विधानसभा) अध्यक्ष: विशाल हुलावळे
- युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष (भोसरी – खेड विधानसभा): अजिंक्य उबाळे
- युवासेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा: सागर पाचार्णे
- युवासेना मावळ तालुकाध्यक्ष: राजेश वाघुले
- युवासेना पिंपरी-चिंचवड उपशहराध्यक्ष: सुजित कांबळे, रविंद्र शेलार, दिगंबर गुंजाळ
- युवासेना भोसरी विधानसभा उपशहराध्यक्ष: ऋषिकेश कुकडे
- युवासेना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष: रोहित बांगर, सागर शिंदे
- सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपाध्यक्ष: अनिरूद्ध जाधव
- युवासेना विभाग उपाध्यक्ष: गौरव राउळ
नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, शिवसेनेची ताकद युवा संघटना आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवकांना संधी दिली जाईल, त्यासाठी युवकांनी संघटन मजबूत करावे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली जनहिताची कामे लोकांपर्यंत पोहोचवावीत. आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे जनतेसाठी काम करत आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे केली जात आहेत. ही कामे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवावीत आणि सरकारच्या योजनांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
#ShivSena #YuvaSena #EknathShinde #Maval #Shirur #PimpriChinchwad #PoliticalAppointments #MaharashtraPolitics #LocalElections
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०८:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: