अहमदाबाद, १३ जून २०२५: भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स कंपनीने १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमधील मेघाणी नगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातातील प्रभावित कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. या कठीण प्रसंगी आपल्या पॉलिसीधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्यासाठी कंपनीने विशेष उपाययोजना सक्रिय केल्या आहेत.
जलद क्लेम सेटलमेंट डेस्क आणि सुलभ प्रक्रिया:
प्रभावित पॉलिसीधारकांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या अडचणींची जाणीव ठेवत, बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सने मृत्यू आणि अपंगत्व दाव्यांच्या तातडीने कार्यवाहीसाठी एक विशेष क्लेम सेटलमेंट डेस्क स्थापन केला आहे. या क्लेम्सची प्रक्रिया तातडीने पूर्ण होण्यासाठी एक जलद व सुलभ प्रणाली लागू करण्यात आली आहे, जेणेकरून पॉलिसीधारकांचे दावे त्वरित निकाली निघतील. या क्लेम्सना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि ते त्वरित निकाली काढले जातील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
किमान कागदपत्रांची आवश्यकता:
क्लेम प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सने नामनिर्देशित व्यक्ती, कायदेशीर वारसदार किंवा पॉलिसीधारक यांनी क्लेम प्रक्रिया सुरू करण्यासाठी सादर करावयाची किमान कागदपत्रे नमूद केली आहेत. मृत्यू प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध नसेल, तर महापालिका प्राधिकरण किंवा रुग्णालयाकडून जारी केलेले प्रमाणपत्र देखील क्लेम प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्वीकारले जाईल. यासोबतच नामनिर्देशित व्यक्तीचे केवायसी (KYC) दस्तऐवज आणि बँक मँडेट सादर करणे आवश्यक आहे.
क्लेम नोंदणीचे सोयीस्कर माध्यम:
क्लेमची नोंदणी खालीलपैकी कोणत्याही सोयीस्कर माध्यमातून करता येईल आणि त्यासाठी संबंधित माहिती सादर करता येईल:
- कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा: १८००-२०९-७२७२
- देशभरातील ५९६ शाखांपैकी आपल्या जवळच्या कोणत्याही शाखेला भेट द्या.
- खालील ईमेल आयडीवर मेल पाठवा: claims@bajajallianz.co.in
बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सने या कठीण प्रसंगी आपल्या पॉलिसीधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आणि अहमदाबादमधील दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांना त्वरित सहाय्य पुरवण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
Bajaj Allianz Life Insurance, Ahmedabad Accident, Claim Assistance, Insurance Claims, Policyholder Support, Disaster Relief
#BajajAllianz #AhmedabadAccident #ClaimAssistance #Insurance #LifeInsurance #DisasterSupport #PolicyholderHelp

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: