चाकण (पुणे) - चाकण येथे प्राणी क्रूरतेचा गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. ३१ मे २०२५ रोजी दुपारी १३.३० वाजता चाकण बैल बाजार बाहेर पुणे-नाशिक रोडवर स्पीड ब्रेकर जवळ पोलिसांनी कारवाई केली आहे.या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१)(ब), (इ) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणातील फिर्यादी संदीप बाळासाहेब मेरगळ (वय ३२ वर्षे) हा चाकण पोलिसात पोशी क्रमांक ३३५३ वर कार्यरत आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी मुस्तफा हनीफ कुरेशी (वय २३ वर्षे) राहणार मोरवाडी लाल टोपीनगर ता. हवेळी जि. पुणे याने ट्रक क्रमांक MH 12 AQ 8404 मध्ये बिनपरवाना प्राणी ठेवले होते.
तपशील देताना पोलिसांनी म्हटले की, आरोपी व्यक्तीने त्याच्या ताब्यातील २ लाख रुपये किंमतीच्या ट्रक क्रमांक MH 12/AQ 8404 यामध्ये विनापरवाना म्हशींची कोणत्याही प्रकारचा चारा पाण्याची सोय न करता दाटी वाटीने ठेवले होते. तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा वाहतूक व कत्तली साठीचा परवाना नसताना ९०,००० रुपये किंमतीच्या १२ म्हशी कत्तली करीता घेवून जात असताना मिळून आले.
-------------------------------------------------------------------------------------------------------
#AnimalCruelty #ChakanPolice #AnimalRights #IllegalTransportation #PuneNews #Maharashtra #AnimalProtectionAct #BuffaloSlaughter #AnimalWelfare #PoliceAction
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२५ ०५:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: