बिजलीनगर, चिंचवड: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात ७५ हजार वृक्षारोपणाच्या संकल्पपूर्तीचा एक भाग म्हणून आणि "व्हय मी सावित्रीबाई बोलतेय" या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण बिजलीनगर येथील ब्रह्मचैतन्य हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाले. उत्तर भारतीय गुरु अमर संयम अमृत वर्षांच्या ७५ व्या संयमी दीक्षा महोत्सवानिमित्त आणि दक्षिण सूर्य ललित लेखक प.पू. डॉ. वरुण मुनीजी म.सा. यांच्या २५ व्या जयंती रजत दीक्षा महोत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वानंद महिला संस्था आणि ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय महिला शाखा, नवी दिल्ली यांच्या वतीने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, ज्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "एक झाड अमरमुनी के नाम" अशा घोषणा देत महिलांनी वृक्षारोपण केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका शारदा मुंडे, सौ. सुजाता चोरडिया, सौ. नीता जैन, सौ. सुनीता कांकरिया, तसेच ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या पंचमझोन अध्यक्षा कल्पना कर्नावट, महामंत्री सुनिता चोरडिया, स्वानंद अध्यक्ष शोभा बंब, राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गुरु अमरमुनींच्या संयम यात्रेनिमित्त आणि लेखक वरुण मुनीजींच्या संयमी दीक्षा निमित्त त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सतर्क राहण्याचा संदेश उपस्थित महिलांना दिला.
या कार्यक्रमात "व्हय मी सावित्रीबाई बोलतेय" या एकपात्री प्रयोगाची सुरुवात प्रा. सुरेखा कटारिया यांनी 'आम्ही सावित्रीच्या लेकी सुना' या सामाजिक आशयाच्या कवितेने केली. एकपात्री प्रयोग सादर करणाऱ्या समाजसेविका शारदा मुंडे यांची मुलाखत कीर्तनकार डॉक्टर श्वेता राठोड यांनी घेतली. सावित्रीचा वारसा त्या कशा पुढे चालवत आहेत, याचा आलेख त्यांनी मुलाखतीतून मांडला, ज्यामुळे उपस्थित महिलांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष शोभा बंब यांनी स्वानंद महिला संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. सुप्रिया सोळंकुरे यांनी स्वानंद सखी मनोगतातून स्वानंद साहित्य भिशीच्या उपक्रमाची माहिती दिली. संस्थेच्या सचिव सीमा गांधी यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात कल्पना बंब यांनी आपली कविता सादर केली. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका विजयश्री मेहता यांनी व्यक्त केले.
World Environment Day, Tree Plantation, One-Act Play, Women Empowerment, Bijlinagar Chinchwad, Swananad Mahila Sanstha
#WorldEnvironmentDay #TreePlantation #SavitribaiPhule #Bijlinagar #Chinchwad #WomenEmpowerment #PuneEvents #EnvironmentalAwareness #JainConference #SvanandMahilaSanstha

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: