काळेपडळ येथे मित्राची वाट पाहणाऱ्याला मारहाण करून लुटले


पुणे: मित्राची वाट पाहत थांबलेल्या एका व्यक्तीला रिक्षातून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी शिवीगाळ व मारहाण करून मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना काळेपडळ रेल्वे बोगद्याजवळ घडली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत काळेपडळ, हडपसर येथे राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी १ जून रोजी सायंकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास काळेपडळ रेल्वे बोगद्याजवळ रस्त्याच्या बाजूला त्यांची मोटारसायकल लावून मित्राची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी रिक्षातून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांची रिक्षा फिर्यादीच्या मोटारसायकलपुढे आडवी लावली. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली आणि त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल फोन व २०० रुपये रोख रक्कम असा एकूण १०,२०० रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला.

इतकेच नाही, तर आरोपींनी तेथे उपस्थित असलेल्या एका साक्षीदारालाही मारहाण करून त्याच्या खिशातील २५० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी रिक्षातून पसार झाले. या घटनेनंतर फिर्यादीने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दोन अज्ञात रिक्षाचालक आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ११८(१), ३५२ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #Robbery #Assault #Kalepadal #Hadapsar #PuneNews
काळेपडळ येथे मित्राची वाट पाहणाऱ्याला मारहाण करून लुटले काळेपडळ येथे मित्राची वाट पाहणाऱ्याला मारहाण करून लुटले Reviewed by ANN news network on ६/०३/२०२५ ०४:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".