पुणे मनपाच्या आरोग्य उपक्रमामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुकर; आठ ठिकाणी मोफत वैद्यकीय केंद्रे

 


पुणे, २५ जून २०२५: आषाढी वारीनिमित्त पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाने संयुक्तपणे राबवलेला मोफत वैद्यकीय मदत उपक्रम यशस्वी ठरला आहे. २० आणि २१ जून २०२५ रोजी पुणे शहरातील आठ प्रमुख ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामुळे सुमारे ४००० वारकऱ्यांनी वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला.

महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त   नवल किशोर राम यांच्या मान्यतेने, तसेच आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे आणि अधिष्ठाता (प्र.) डॉ. सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालवण्यात आला. या उपक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे ११० वैद्यकीय विद्यार्थी सहभागी झाले होते.

या उपक्रमाची प्रमुख ठिकाणे:

  • अलका टॉकीज चौक

  • समाधान चौक

  • डुल्या मारुती चौक

  • ट्रायडेंट हॉटेल

  • रफी अहमद किडवाई शाळा

  • मामासाहेब बडदे रुग्णालय

  • पालखी विठोबा चौक (ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामतळ)

  • निवडुंग विठोबा चौक (तुकाराम महाराज पालखी मुक्कामतळ)

या केंद्रांवर प्राथमिक उपचार (First Aid), औषध वितरण, जखमांवर ड्रेसिंग आणि फिजिओथेरपी सेवा पुरवण्यात आल्या. वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा प्रदान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता आणि तो यशस्वीरित्या साध्य झाल्याचे दिसून आले.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय ठरले. या उपक्रमामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सेवेचा अनुभव मिळाला, तर हजारो वारकऱ्यांना प्रवासात मोठा दिलासा मिळाला.

या यशस्वी उपक्रमासाठी  नवल किशोर राम (प्रशासक तथा आयुक्त, पुणे मनपा),  एम. जे. प्रदीप चंद्रन (अतिरिक्त महापालिका आयुक्त), डॉ. नीना बोराडे (आरोग्य अधिकारी), डॉ. सुनीता सावंत (अधिष्ठाता, प्र.), आबाजी खाडे (मुख्य प्रशासकीय अधिकारी), डॉ. ज्योती लांडगे (HOD, कम्युनिटी मेडिसिन), डॉ. अभिजीत वडाते (असोसिएट प्रोफेसर, ओ बि जी वाय),  विनोद इंगोले (प्रशासकीय अधिकारी), आणि  अभिषेक जगताप (जनरल सेक्रेटरी, विद्यार्थी) यांचे विशेष आभार मानण्यात आले.


Pune Municipal Corporation, Wari Festival, Healthcare Initiative, Free Medical Camp, Pilgrims' Health, Public Service, Medical College, Palkhi Sohala

#Pune #PMC #Wari2025 #Healthcare #MedicalCamp #PilgrimHealth #PublicService #AtalBihariVajpayeeMedicalCollege #PalkhiSohala #FirstAid

पुणे मनपाच्या आरोग्य उपक्रमामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुकर; आठ ठिकाणी मोफत वैद्यकीय केंद्रे पुणे मनपाच्या आरोग्य उपक्रमामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुकर; आठ ठिकाणी मोफत वैद्यकीय केंद्रे Reviewed by ANN news network on ६/२५/२०२५ ०६:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".