'नगरीचे शिल्पकार' म्हणून गौरव
पिंपरी, दि. २५ जून २०२५: पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष, आमदार आणि खासदार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना आज भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस, तसेच प्रांगणातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता अनिल भालसाखरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल अविनाश ढमाले यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या जडणघडणीत पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. शहरातील पायाभूत सुधारणा आणि मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. नागरिकांसाठी विस्तृत रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, सार्वजनिक दवाखाने, उद्याने आणि वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारातून दिलेले योगदान आजही महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या कार्यामुळेच पिंपरी-चिंचवड शहर विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचले, असे मत या वेळी अनेकांनी व्यक्त केले.
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Homage, Former MP, Annasaheb Magar, City Founder, Civic Development, Public Service
#PCMC #AnnasahebMagar #PimpriChinchwad #Homage #CivicLeader #CityBuilder #MaharashtraPolitics #PublicService #Tribute

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: