पिंपरी चिंचवड: दिघी येथे पतीच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती तिला दिसायला चांगली नाही म्हणून हिणवत होता, तसेच माहेरून पैशांसाठी दबाव टाकत होता आणि सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी श्री. शिवाजी संपतराव सूर्यवंषी (वय ५६ वर्षे, चालक, रा. पवार नगर ४, थेरगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी नरसिंह वामनराव माने (वय ३३ वर्षे, रा. तनिष पर्ल, एफ/६०१, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) अद्याप फरार आहे.
ऑगस्ट २०१९ पासून ते दि. ०३/०६/२०२५ रोजी दुपारी ०३:४० वाजण्याच्या दरम्यान पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने राहत असताना आणि तसेच तनिष पर्ल, एफ/६०१, चऱ्होली बुद्रुक येथे ही घटना घडली. फिर्यादीची मुलगी सुजाता नरसिंग माने (वय ३२ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. तनिष्क पर्ल एफ/६०१ चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) हिचे लग्न दि. २५/०६/२०१९ रोजी झाल्यानंतर ती पती आरोपी नरसिंग माने याच्याकडे पुण्यात नांदत होती. तिचा पती नरसिंगने सुजाताला 'ती दिसायला चांगली नाही' म्हणून हिणवले. तसेच, तिच्यासोबत वेळोवेळी भांडण करून तिला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केली. तिला माहेरवरून पैशांसाठी दबाव टाकून फ्लॅटसाठी पैसे तसेच आर्थिक अडचणीसाठी फिर्यादीच्या पत्नीचे जुने सोन्याचे दागिने घेऊन गहाण ठेवले. त्याने तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केला आणि दि. ०३/०६/२०२५ रोजी दुपारी ०३:४० वाजता गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
या प्रकरणी दिघी स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २३९/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८ (अपप्रेरणा), ८५ (छळ), ३५२ (गैरहल्ला), ३४० (७)(७) (गुन्हेगारी कट) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अंभोरे करत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Domestic Violence, Suicide Abetment, Harassment, Crime, Pimpri Chinchwad, Dighi #DomesticViolence, #SuicideAbetment, #PimpriChinchwad, #DighiCrime, #CrimeNews
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२५ ०७:४५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: