पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास उत्तरप्रदेशात जाऊन ठोकल्या बेड्या

 


सराईत गुन्हेगार उत्तर प्रदेशातून अटकेत

पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्याची उकल करत, सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ३२०० किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांनी हा गुन्हेगार ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शाहरुख शकील मन्सुर (वय २७ वर्षे, रा. मूळगाव अमखेरा, शहाजपुर, धामपुर, बिजनोर, उत्तरप्रदेश, सध्या रा. लेन नंबर १६ ए, सय्यदनगर, इनामदार स्कुलजवळ, हडपसर, पुणे) असे आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी आणि चोरीचे एकूण ५ गुन्हे कोंढवा आणि हडपसर स्टेशनमध्ये दाखल आहेत.

दि. २०/०५/२०२५ रोजी शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या दरम्यानच्या सर्व्हस रोडवर, धबाडी, आंबेगाव बु, पुणे येथे एका महिलेच्या डोक्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार हत्याराने वार करून, तिला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २६२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि तपास पथकातील अंमलदार यांनी मृत महिलेच्या मोबाईल नंबरवरून तिच्या हालचाली तपासल्या. कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंत सुमारे १०० आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, मृत महिला दुचाकी गाडीवर बसून नवले पुलावर आल्याचे समजले. नवले पुलाजवळील आस्थापनांचे सुमारे ७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, २०/०५/२०२५ रोजी भरभर पाऊस पडत असल्याने आणि सार्वजनिक रोडवरील लाईट अपुरी असल्यामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे तेथील रोडलगत असलेल्या खासगी आस्थापनांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करत असताना, तिथे वीज चमकल्यामुळे झालेल्या प्रकाशात मृत महिला एका रिक्षात बसताना दिसली. सदर रिक्षा टी.व्ही.एस. कंपनीची आणि तिचे मागील बाजूचे हुड पूर्णतः काळ्या रंगाचे असल्याचे समजले. त्या रिक्षाचा शोध घेण्यासाठी पुणे आरटीओकडून टी.व्ही.एस. कंपनीच्या पुणे शहरात रजिस्टर असलेल्या १०,७९४ रिक्षांची माहिती प्राप्त करून, त्या रिक्षांपैकी १२०० रिक्षांच्या वाहतूक विभागाकडून झालेल्या दंडात्मक कारवाईच्या चलनावरून रिक्षाचे पुढील व मागील फोटो प्राप्त केले. त्यानंतर, नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या हायवेवरील आस्थापनांमधील १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रिक्षाचा शोध घेऊन त्यामध्ये रिक्षा आणि आरोपी शाहरुख शकील मन्सुर याने मृत महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर, उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील अंमलदार यांनी पुणे ते अमखेरा, शहाजपुर, धामपुर, बिजनोर, उत्तरप्रदेश असे एकूण ३२०० किमी अंतरावर जाऊन आरोपी शाहरुख शकील मन्सुर याचा शोध घेऊन त्याला दि. ०९/०६/२०२५ रोजी धामपुर स्टेशन येथे अटक केली.

सदरची कामगिरी अपर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उप आयुक्त (परिमंडळ-२) स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ स्टेशनकडील वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगांवकर, निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार राहुल शेडगे, नागेश पिसाळ, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सागर बोरगे, मितेश चोरमोले, किरण साबळे, निलेश खैरमोडे, व आंबेगाव स्टेशनकडील धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.

  • ------------------------------------------------------------------------------------------------------------- Crime, Murder, Arrest, Pune Police, Inter-state Operation, Forensics
  •  #PuneCrime, #MurderInvestigation, #Arrest, #PoliceSuccess, #CCTVFootage, #InterstateArrest
पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास उत्तरप्रदेशात जाऊन ठोकल्या बेड्या पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास उत्तरप्रदेशात जाऊन ठोकल्या बेड्या Reviewed by ANN news network on ६/१३/२०२५ ०७:४०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".