अंदाजे १२,५०० चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामावर कारवाई
पुणे, दि. ५ जून २०२५: पुणे महानगरपालिकेने आज फर्ग्युसन कॉलेज रोडवरील फायनल प्लॉट क्र. ६१४ बी (Final Plot No. 614B) येथील अनधिकृत दुकाने हटवण्याची कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे १२,५०० चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामाचा समावेश होता.
शहर अभियंता व अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, बांधकाम विकास विभाग झोन ६ मार्फत ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सदर मोहिमेचे नेतृत्व कार्यकारी अभियंता सुरेंद्र करपे यांनी केले.
या कारवाईत त्यांच्यासोबत उपअभियंता रणजीत मुटकुळे, . किरण कलशेट्टी, श्रीमती वळसे-पाटील, तसेच कनिष्ठ अभियंते महेश शिंदे, मनोजकुमार मते, सागर शिंदे, श्रीमती घोलप, श्रीमती झोडापे आणि इतर तांत्रिक सहाय्यक व सेवक यांनी सहभाग घेतला.
#Pune #PMC #EncroachmentDrive #IllegalConstruction #FergussonCollegeRoad #PuneNews #Demolition #UrbanDevelopment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: