तळेगाव एमआयडीसीजवळ भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू



पिंपरी-चिंचवड, दि. २: तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवलाख उंब्रे येथे भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत एका २८ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात १ जून २०२५ रोजी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. राजेश राजदुराई (वय २८, मूळ रा. कल्याणी स्टेट, कलिकवलपुरम, जि. नागापट्टिनम, तामिळनाडू) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी विजय राघवान सुब्बाराज (वय ३३, रा. अर्बनलाईफ सोसायटी, सी ब्लॉक, फ्लॅट नं. १२०४, कातवी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत राजेश हा फिर्यादीचा चुलतभाऊ होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजेश हा त्याच्या ताब्यातील होंडा ऍक्टिव्हा (TN 12 AB 1751) वरून जात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रेलर (MH 14 EM 9075) चालकाने अत्यंत हयगयीने, अविचारीपणे आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवले.

ट्रेलर चालकाने राजेशच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत राजेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ट्रेलर (MH 14 EM 9075) चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६, १२५(अ), (ब) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे  करत आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------------- #PimpriAccident #TalegaonMIDC #RoadRage #FatalCrash #TrailerAccident #PunePolice 

तळेगाव एमआयडीसीजवळ भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तळेगाव एमआयडीसीजवळ भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू Reviewed by ANN news network on ६/०२/२०२५ ०३:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".