पिंपरी चिंचवड: पिंपरी येथे एका महिलेची जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांची रोख रक्कम हडपल्याप्रकरणी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी एका महिला फिर्यादी (वय ४० वर्षे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये प्रशांत नागेश दिक्षीत (वय अंदाजे ४० वर्षे, रा. ऑक्सिजन पार्कजवळ, चिंचवड, पुणे) आणि संतोष नागेश दिक्षीत (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. ऑक्सिजन पार्कजवळ, चिंचवड, पुणे) यांचा समावेश आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दि. ०२/०१/२०२२ पासून ते आजपर्यंत सीटीएस नं ४६११, गट नं २, सर्व्हे नं २२/१ व २२/२, शेवाळे सेंटर इमारतीमधील तळमजला व पहिला मजला, पिंपरी, पुणे येथे ही फसवणूक झाली. आरोपींनी फिर्यादींना 'आर. डी. ऑटो इक्विपमेंट प्रा. लि.' या ह्युंदाई कंपनीच्या चारचाकी गाड्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये ४०,००,०००/- (चाळीस लाख रुपये) रोख रक्कम गुंतवून चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपींनी वरील रकमेचा अपहार करून फसवणूक केली. तसेच, फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पिंपरी स्टेशनमध्ये क्रमांक २४८/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपनिरीक्षक दलालवाड करत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------
Financial Fraud, Investment Scam, Cheating, Pimpri Chinchwad, Pimpri, Crime
#FinancialFraud, #InvestmentScam, #PimpriChinchwad, #Cheating, #CrimeNews
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२५ ०७:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: