पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था' प्रस्तुत 'लक्ष्य' हा शास्त्रीय एकल नृत्यांचा कार्यक्रम शुक्रवार, १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कलाविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.
या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्य प्रशिक्षक वैजयंती काशी (कुचीपुडी), अथर्व चौधरी (भरतनाट्यम) आणि डॉ. देविका बोरठाकूर (सत्तरीया) हे नामवंत कलाकार आपली नृत्यकला सादर करतील. 'लक्ष्य' हा उपक्रम विविध नृत्य शैलीतील एकल सादरीकरणासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो, ज्यात देशभरातील प्रतिभावान कलाकार सहभागी होतात.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा २४८ वा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश असल्याची माहिती भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली आहे.
Cultural Event, Dance Performance, Pune, Classical Dance, Lakshya, Bharatiya Vidya Bhavan, Infosys Foundation, Art, Free Entry- #Pune #ClassicalDance #Lakshya #BharatiyaVidyaBhavan #InfosysFoundation #DancePerformance #FreeEntry #CulturalEvent #MarathiNews #PuneEvents
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२५ ०८:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: