पुणे शहर: पुणे शहर गुन्हे शाखेच्या विमानतळ पोलीस स्टेशनमधील तपास पथकाने दिनांक २२ जून २०२५ रोजी एका मोठ्या कारवाईत १२ किलो गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगाव, कर्मभूमीनगर येथे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, कर्मभूमीनगर येथे एक इसम गांजा नावाचा अंमली पदार्थ घेऊन थांबलेला आहे. या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफने सापळा रचून सदर इसमाला शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमाला त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव अखिलेश गरीब मंडल (वय ३४, रा. लेन नं. ०१, कर्मभूमीनगर, काळभोर वस्ती, लोहगाव, पुणे) असे सांगितले. त्याच्याकडील कापडी पिशवीची झडती घेतली असता, त्या पिशवीमध्ये ३,००,०००/- रुपये किमतीचा १२ किलो गांजा आढळला.
आरोपी अखिलेश मंडल याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं. २९२/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (II) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर आयुक्त, मनोज पाटील, उप-आयुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक, गोविंद जाधव, निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे, उप-निरीक्षक नितीन राठोड, अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बडे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरिप्रेम पुंडे, लालू कोल्हे, शंकर वाघुले यांनी केली.
Drug Bust, Ganja Seizure, Airport Police Station, Pune Crime, Narcotics, Arrest.
#PunePolice #DrugBust #Ganja #NDPSAct #AirportPolice #CrimeNews
Reviewed by ANN news network
on
६/२५/२०२५ ०५:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: