'विचार प्रबोधन पर्वा'चे उद्घाटन
पिंपरी, दि. २६ जून २०२५: थोर समाजसुधारक, आरक्षणाचे जनक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस आणि केएसबी चौक, चिंचवड येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन सोहळा
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि तृप्ती सांडभोर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी महापौर मंगला कदम, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील, मिलिंद वेल्हाळ, शांताराम खुडे, सुनील पाटील, विजय नाळे, जगदीश परिट, संग्राम पाटील, लहु पवार, संदिप देसाई, पी. बी. पाटील, युवराज तिकटे, बापू गायकवाड, दत्ता गायकवाड तसेच कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
केएसबी चौक, चिंचवड येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा प्रांगणात झालेल्या अभिवादन कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य मारुती भापकर, बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते धनाजी येळकर पाटील, अजिझ शेख, वैभव जाधव, बापू गायकवाड, सखाराम रेडेकर, शामराव पताडे, नामदेव शिंत्रे, प्रविण कदम, अप्पा पाटील, अरूण गळतगे, शिवाजीराव पाटील, लक्ष्मण टकेकर, विश्वनाथ टकेकर, सुधीर पाटील तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
दोन दिवसीय 'विचार प्रबोधन पर्व'
महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय 'विचार प्रबोधन पर्वा' चे उद्घाटन चिंचवड येथील साई मंदिर उद्यान येथे करण्यात आले. यावेळी माजी महापौर मंगलाताई कदम, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रा. महेश निगडे, प्रा. दिलीप शेलार, शाहीर प्रकाश ढवळे, लेखक श्रीकांत चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील, विजय नाळे, मिलिंद वेल्हाळ, जगदीश परिट, सुनील पाटील यांच्यासह कोल्हापूर मित्र मंडळाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नव्हते, तर ते एक समाजसुधारक आणि शिक्षणासाठी झटणारे खरे लोकराजेही होते. त्यांनी आपल्या काळात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अनिष्ट रूढी-परंपरांना आव्हान देत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांची विचारधारा आजही समाजासाठी दिशादर्शक असून, ती पुढील पिढ्यांनीही जपली पाहिजे."
'वीर धुरंधर योध्यांचा जागर – शिवशंभो गर्जना'
विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता ''वीर धुरंधर योध्यांचा जागर – शिवशंभो गर्जना'' या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात अभिजित जाधव व आमु जाधव यांनी रणवाद्यांवर आधारित क्रांतिकारक गीते सादर केली. अत्याधुनिक वाद्यांच्या जुगलबंदीवर त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले आणि महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा आणि जीवनप्रवासाचा जागर केला. यावेळी त्यांनी ''साथीला माती तांबडी, शाहू महाराज मूर्ती रांगडी’’, ‘’वाघ शिवबा जन्मला’’, ‘’रायगड किल्ला, महाराष्ट्राची शान’’ अशी स्फूर्तीदायक गीते सादर करून संबळ-दिमडी वाद्यांची जुगलबंदी सादर केली. या कार्यक्रमात त्यांना सुनील शिंदे आणि भावेश खानविलकर यांची साथ लाभली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. निगडे यांनी दहावीप्रमाणे बारावी देखील महत्त्वाचे वर्ष असल्याचे सांगितले. बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होतो. कोणत्या विषयात प्रवेश घ्यायचा या प्रश्नावर त्यांनी विविध पर्यायांवर प्रकाश टाकला. सध्या अभियांत्रिकी आणि डॉक्टरेटच्या शिक्षणात स्पर्धा वाढल्याने, विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, डेटा सायन्स, फिल्ममेकिंग, एआय इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट यांसारख्या इतर व्यावसायिक शिक्षण पर्यायांचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. व्यावसायिक शिक्षणानंतर परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध असून, त्यासाठी परकीय भाषा (जर्मन, फ्रेंच, इटालियन) शिकणे फायदेशीर ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Jayanti, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Social Reformer, Reservation Pioneer, Thought-Provoking Event, Cultural Program, Student Guidance
#ChhatrapatiShahuMaharaj #ShahuJayanti #PimpriChinchwad #SocialReformer #ReservationPioneer #VicharPrabodhanParva #PCMC #CulturalEvent #StudentGuidance

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: