आशिष शेलार यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींच्या 'इमर्जन्सी डायरीज'चे प्रकाशन

 

मुंबई, २६ जून २०२५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीतील अनुभवांवर आधारित 'इमर्जन्सी डायरीज: इयर्स दॅट फोर्ज्ड अ लीडर' (Emergency Diaries: Years that Forged a Leader) या पुस्तकाचे प्रकाशन आज सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.

ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात, आणीबाणीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिगत राहून केलेले कार्य, बंदी घालण्यात आलेल्या साहित्याचे वाटप आणि जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या प्रकाशन सोहळ्याला प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, विजय (भाई) गिरकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. हे पुस्तक वाचकांना आणीबाणीच्या काळातील मोदींच्या संघर्षाची आणि एका नेत्याच्या जडणघडणीची माहिती देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Narendra Modi, Emergency, Book Launch, Ashish Shelar, Political Biography, Bluekraft Digital Foundation, Indian Politics, Mumbai Event

 #EmergencyDiaries #NarendraModi #BookLaunch #AshishShelar #IndianPolitics #Emergency1975 #Leadership #Mumbai #BluekraftDigitalFoundation

आशिष शेलार यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींच्या 'इमर्जन्सी डायरीज'चे प्रकाशन आशिष शेलार यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींच्या 'इमर्जन्सी डायरीज'चे प्रकाशन Reviewed by ANN news network on ६/२६/२०२५ ०५:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".