नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन
पुणे : गुरुवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी आंबेगाव पठार व धनकवडी परिसरातील पाणीपुरवठा संपूर्ण दिवसभरासाठी बंद राहणार आहे. स्थानिक जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी व तांत्रिक दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हे नियोजन केले आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, दिनांक २७ जून २०२५ रोजी (शुक्रवार) पाण्याचा दबाव कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या दोन्ही दिवसांमध्ये पाण्याचा साठा करून ठेवावा व योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारे भाग:
तिनमूर्ती चौक, चिंतामणि ज्ञानपीठ ते तिनमूर्ती चौक, भारतीय विद्यापीठ, आंबेगाव पठार सर्वे नं. १५ ते ३०, धनकवडी सर्वे नं. २८, २९, ३०, ३६ व ३७, तसेच चैत्यनगर, अक्षयनगर, राजमुद्रा सोसायटी, रिक्षासोसायटी, विद्यानगरी, मोहननगर आदी परिसरांचा समावेश आहे.
या देखभाल व दुरुस्तीच्या कामात महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
water supply, Pune news, PMC water maintenance, Ambegaon water cut, Dhankawadi water issue, Pune Municipal Corporation
#PuneNews #WaterSupplyCut #Ambegaon #Dhankawadi #PMCUpdate #PuneMunicipalCorporation #WaterAlert

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: