पुणे: नांदेडसिटी परिसरातील ओंकार बिल्डिंगमधील एका बंद फ्लॅटमधून ४,९७,०००/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७/०५/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजल्यापासून ते दि. ०३/०६/२०२५ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या दरम्यान फ्लॅट नं. ०९, ओंकार बिल्डिंग, एशियन कॉलेज जवळ, न-हे, पुणे येथे ही घरफोडी झाली. फिर्यादींचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर, बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक गजानन पोतदार पुढील तपास करत आहेत.
- --------------------------------------------------------------------------------------------------------- #NandedCityCrime, #Burglary, #Theft, #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: