पिंपरी-चिंचवड: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने पिंपळे निलख येथील अंगणवाडीत एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी अंगणवाडीतील लहानग्यांना पाटी, पेन्सिल, डस्टर, कलर आणि खाऊ भेट देण्यात आला. तसेच अंगणवाडीला एक नवीन फळा (ब्लॅकबोर्ड) भेट देऊन शिक्षणासाठी उपयुक्त साधनांची भर घालण्यात आली.
या उपक्रमामागे "छोट्या वयातच ज्ञानाचं शस्त्र हाती देणं म्हणजे शिवरायांना खरी आदरांजली" हा विचार होता. बालवयात शिक्षणाची गोडी लावणं, हीच खरी संस्कृती आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिक्षण हा मूलभूत हक्क होता आणि आजच्या काळातही तो विचार जपला गेला पाहिजे, यावर भर देण्यात आला.
रविराज काळे यांनी सांगितले की, "हा उपक्रम लहान असला तरी मोठ्या सामाजिक परिवर्तनाचं बीज रोवणारा आहे. शिक्षण हाच खरा बदलाचा पाया आहे."
या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून व अंगणवाडी सेविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
#ShivrajyabhishekDin #PimpleNilakh #Education #SocialInitiative #AamAadmiParty #PimpriChinchwad #RavirajKale #Anganwadi #CommunityService
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०५:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: