पिंपरी-चिंचवड, २० जून २०२५: टाळ-मृदंगाच्या लयीत 'ज्ञानोबा-तुकाराम' चा गजर करत पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात आज (२० जून २०२५) दिमाखात आगमन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित या स्वागत सोहळ्यात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पालखीचे स्वागत केले.
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे शहरात भोसरी फाटा, दिघी येथील मॅगझिन चौकात आगमन झाले. या खास सोहळ्यासाठी पालिकेने मॅगझीन चौक येथे स्वागत कक्ष उभारला होता. या ठिकाणी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा करताना दिसले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सचिन पवार, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, नाना मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, संतपीठाचे विश्वस्त राजू महाराज ढोरे तसेच विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत कक्षामध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मानाच्या दिंड्यांना प्रथमोपचार पेटी, देशी वृक्षांच्या बिया, तुळशीचे रोप, संपर्क माहिती पुस्तिका आणि कापडी पिशवी देऊन सन्मानित करण्यात आले. मॅगझिन चौक येथे भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावर्षीही उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने पालखी स्वागताच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती, ज्यामुळे छायाचित्रे काढण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, आषाढी वारीनिमित्त वृक्षारोपण आणि हरितवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आले आहेत. स्वागताच्या ठिकाणी महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Sant Dnyaneshwar Palkhi, Pimpri-Chinchwad, Wari, Palkhi Sohala, Civic Welcome, Maharashtra, Shekher Singh, Vinaykumar Chaube
#DnyaneshwarPalkhi #PimpriChinchwad #Wari #PalkhiSohala #PCMC #AshadhiWari #MaharashtraCulture
Reviewed by ANN news network
on
६/२०/२०२५ ०५:११:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: