पुणे: वारकरी संप्रदायाच्या वारी परंपरेचा सन्मान करत आणि 'सर्व धर्म समभाव' या संकल्पनेतून, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे, आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने 'राष्ट्रीय सेवा योजना' अंतर्गत विविध वारकरी सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांची सुरुवात २१ जून रोजी सकाळी ११ वाजता 'स्कायलाईन बिल्डिंग (नाना पेठ)' येथे होणार आहे. अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात वारकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात येईल.
त्यानंतर, २२ जून २०२५ रोजी 'स्कूल ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अँड आर्ट' विभागातर्फे खिचडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, जे माऊलींच्या विविध पालख्यांचे आगमन पाहता भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
या सेवाकार्याचा तिसरा टप्पा २३ जून २०२५ रोजी सासवड येथे पार पडेल. अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथेही 'वारकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंचा वस्तू वाटप कार्यक्रम' होणार आहे.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार आणि सचिव प्रा. इरफान शेख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्रा. मुझफ्फर शेख, डॉ. धनंजय पालने, डॉ. किरण भिसे, डॉ. अनिता बेलापूरकर, लीना देबनाथ, डॉ. रोशन काझी, प्रा. जावेद खान, डॉ. ऋषी आचार्य इत्यादी मान्यवर या कार्यक्रमांच्या संयोजनात सक्रिय भूमिका बजावत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Azam Campus, Palkhi Seva, Warkari, Dr. P.A. Inamdar University, Maharashtra Cosmopolitan Education Society, National Service Scheme, Pune, Interfaith Harmony
#AzamCampus #WarkariSeva #PalkhiSohala #Pune #PAInamdarUniversity #NSS #SarvaDharmaSambhav

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: