ठाणे (प्रतिनिधी) ७ जून - ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने उल्हासनगर-४ येथे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोन महिला दलालांना अटक केली आहे. या कारवाईत तीन पीडित आणि असहाय्य महिलांची सुटका करण्यात आली आहे.
गेल्या ५ जूनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती चेतना चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की, हंसधाम को-ऑपरेटिव् हाउसिंग सोसायटी, कृष्णनगर, उल्हासनगर-४ या ठिकाणी दोन महिला दलाल काही पीडित व असहाय्य महिलांना फसवून वेश्यागमनासाठी बोलावणार होत्या.
या माहितीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी दोन महिला दलालांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या रखवालीत असलेल्या तीन पीडित महिलांची यशस्वीरित्या सुटका केली.
या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १३९७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १४३(१), १४३(३), ३(५) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव (गुन्हे), सहाय्यक आयुक्त विनय घोरपडे (प्रतिबंध, गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चेतना चौधरी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
Crime News, Thane Police, Human Trafficking, Armed Robbery, Liquor Smuggling, Maharashtra, Print Media, Breaking News
#ThanePolice #CrimeNews #HumanTrafficking #ArmedRobbery #LiquorSmuggling #BreakingNews #Maharashtra #PrintMedia #CrimeBusters #LawEnforcement

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: