ए एन एन न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड परिसरातील गुन्हेविषयक बातमीपत्र
दिनांक २९ मे २०२५
पुणे
शहरात २८ मे
२०२५ रोजी जबरी
चोरी, ऑनलाइन फसवणूक
आणि चोरीच्या विविध
घटना घडल्या. पोलिसांनी या
प्रकरणी गुन्हे दाखल केले
असून तपास सुरू
आहे.
बाणेर: एका ४०
वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली सुमारे २६ लाख रुपयांची फसवणूक
झाली. अज्ञात आरोपीने फिर्यादीला शेअर
ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून
हे कृत्य केले.
या प्रकरणी बाणेर
पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला
आहे.
वानवडी: वानवडी येथे
एका ३७ वर्षीय
व्यक्तीला मारहाण करून साडेतीन हजार
रुपये रोख रक्कम
चोरी करण्यात आली.
ही घटना २७
मे रोजी रात्री
साडेअकरा वाजता
एएफएमसी बस स्टॉप भैरोबानाला, फातीमानगर येथे
घडली. अज्ञात आरोपीने फिर्यादीला मारहाण
करून त्याच्या खिशातील पैसे
जबरदस्तीने चोरले.
खडकी: खडकी परिसरात एका
६५ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील ४५
हजार रुपये किमतीची सोन्याची चेन
चोरीला गेली. ही
घटना २८ मे रोजी
सायंकाळी साडेसहा वाजता एल्फीस्टन रोडवर
घडली. अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील चेन
जबरदस्तीने चोरून नेली.
स्वारगेट: स्वारगेट बस
स्थानकावर एका ६५ वर्षीय
महिलेच्या पर्समधून ४ हजार रुपये
रोख आणि ८०
हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने
चोरीला गेले. ही
घटना २१मे रोजी सकाळी पावणेदहा वाजता
घडली. अज्ञात चोरट्याने बसमध्ये चढताना
गर्दीचा फायदा घेऊन पर्समधून ऐवज
चोरला.
पर्वती: सहकारनगर येथे
बसमध्ये चढताना एका ६९
वर्षीय व्यक्तीच्या खिशातील साडेनऊ हजार
रुपये चोरीला गेले.
ही घटना २८मे रोजी सकाळी
साडेअकरा वाजता शिंदे हायस्कूलजवळ घडली.
चार अज्ञात चोरट्यांनी गर्दीत
खिशातील पैसे काढले.
पिंपरी चिंचवड परिसरात २८ मे २०२५ रोजी जबरी चोरी, मारामारी, अपघात आणि अमली पदार्थ जप्तीसह विविध गुन्हे दाखल झाले आहेत.
सांगवी: २८ मे रोजी
रात्री साडेबारा
वाजता कोकणे चौक
ते पवना नगर,
पिंपळे सौदागर येथे
जबरी चोरीची घटना
घडली. फहरान अल्ली
शेख आणि त्याचा मित्र
जात असताना, सुरज
नामदेव सुतार याने त्यांना शिवीगाळ करून
मारहाण केली आणि
२ हजार रुपये
जबरदस्तीने चोरले. आरोपीला अटक
करण्यात आली आहे
निगडी: २८
मे रोजी साडेबारा
वाजता भेळ चौक,
निगडी येथे मारामारीची घटना
घडली. सलमान शेख,
आमीर शेख आणि
अकबर मुलाणी यांनी
साहिल युनुस शेख
आणि अश्रफ यांना
मारहाण करून जखमी
केले.
भोसरी एमआयडीसी: २८ मे रोजी
सकाळी सात वाजता लियर कंपनी
गेट नंबर २
समोर अपघात झाला.
अज्ञात रिक्षा चालकाने धडक
दिल्याने अमोल राजाराम मसुरे
आणि वसंत विठ्ठल
गायकवाड जखमी झाले
दिघी: २७ मे
रोजी रात्री
पावणेनऊ वाजता इंद्रायणीनगर परिसरात गांजा
जप्त करण्यात आला.
स्वामी भागवत माने
याच्या ताब्यात १२
हजार ९५० रुपये किंमतीचा २५९
ग्रॅम गांजा मिळाला.
आरोपीला अटक करण्यात आली
आहे.
चाकण: २८ मे रोजी
दहा वाजून चव्वेचाळीस
मिनिटांनी ेनाणेकरवाडी येथे
गांजा जप्त करण्यात आला.
आकाश सिंग अजयप्रताप सिंग
ठाकूर याच्या ताब्यात ६०
हजार ४००रुपये
किंमतीचा १ किलो ७८
ग्रॅम गांजा मिळाला.
आरोपीला अटक करण्यात आली
आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: