पुणे: हडपसर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना ३ विधी संघर्षित बालकांकडून ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी ३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांसंबंधी तपास करत असताना, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५, डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांनी तपास पथक तयार केले.
तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले आणि पेट्रोलिंग करत असताना ३ विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात, त्यांनी मागील २ महिन्यांत वेळोवेळी घरफोडी केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी त्यांच्याकडून ३ गुन्हे उघडकीस आणले असून, २,७५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, ६०,०००/- रुपये किंमतीचे २ लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली ५०,०००/- रुपये किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण ३,८५,०००/- रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
सदर कामगिरी अपर आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, उप आयुक्त परि- ५ डॉ. राजकुमार शिंदे आणि सहाय्यक आयुक्त, हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, संजय मोगले, पोनि. (गुन्हे), निलेश जगदाळे आणि तपास पथकाने केली.
- ------------------------------------------------------------------------------
- #Crime, #Theft, #JuvenileCrime, #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: