मुंबई, १३ मे २०२५: मुंबई शहराच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशानुसार ड्रोन उडवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश ०५ मे २०२५ पासून ते ०३ जून २०२५ पर्यंत लागू आहेत. असे असतानाही, पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २३ वर्षीय तरुणाने ड्रोन उडवून या आदेशाचे उल्लंघन केले, ज्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उप आयुक्त (अभियान), मुंबई कार्यालयाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) या संस्थेने मुंबई शहराचा काही भाग 'रेड झोन' म्हणून घोषित केला आहे, त्यामुळे अधिकृत परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास सक्त मनाई आहे.
घडलेल्या घटनेत, १२ मे २०२५ रोजी पवई पोलिसांनी एका तरुणावर भा.दं.वि. कलम २२३ बी.एन.एस. अन्वये गुन्हा क्रमांक ४३१/२०२५ नोंदवला आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पोलीस आयुक्तांच्या ड्रोन बंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, जर कोणालाही ड्रोन उडवताना आढळल्यास, त्यांनी तात्काळ १००/११२ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------------
#MumbaiPolice
#DroneBan
#FlyingProhibited
#SecurityAlert
#LawEnforcement
#RedZone

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: