रविवार, १८ मे, २०२५

विठ्ठल ममताबादे यांना मित्र आणि मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

 


 साधेपणाने वाढदिवस साजरा

उरण, दि. १८ : १७ मे १९८६ रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले, उच्चशिक्षित, साधे आणि विनम्र व्यक्तिमत्त्वाचे तसेच दांडगा जनसंपर्क असलेले आणि उरणमधील विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असलेले पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा १७ मे रोजी वाढदिवस होता.

यानिमित्त उरण शहरातील विमला तलाव गार्डनमध्ये मॉर्निंग ग्रुप आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांना गुलाबपुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी  ममताबादे यांना दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

----------------------------------------------------------------------------------------------

#Uran #JournalistBirthday #VitthalMamtavade #SocialActivist #SimpleCelebration #MaharashtraNews #LocalNews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा