पिंपरी-चिंचवड: अमृत भारत योजनेअंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड आणि तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकांच्या कामांना गती देण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. कामांमध्ये त्रुटी सुधारून दर्जेदार काम वेळेत पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवारी खासदार बारणे यांनी या चारही रेल्वे स्थानकांना भेट देऊन कामाचा आढावा घेतला. प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामाचा दर्जा आणि गती यांबाबत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी पुणे अप्पर रेल्वे उपप्रतबंधक पद्मसिंह जाधव, पुणे मुख्य परियोजना प्रतिबंधक गती शक्ती युनिट संजय लोहत्रे, वरिष्ठ मंडल अभियंता विजय कुमार राय, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता पराग अकनुरकर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक ए.के. पाठक यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, "अमृत भारत योजनेअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांचे काम सुरू आहे. या कामात काही त्रुटी आढळल्या आहेत, त्या तातडीने दुरुस्त कराव्यात. कामाचा दर्जा चांगला ठेवावा आणि डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करावे." रेल्वे स्थानकांवर बैठक कक्ष, लिफ्ट, पार्किंग आणि सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत.
प्रवाशांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले, मात्र पुणे-लोणावळा दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू करण्याची आणि सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत चालवण्याची मागणी केली. या मागण्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मांडल्या असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे बारणे यांनी सांगितले.
------------------------------------------------
#पिंपरीचिंचवड
#रेल्वेस्टेशन
#अमृतभारतयोजना
#श्रीरंगबारणे
#रेल्वेअधिकारी
#प्रवासी
#लोकल
#सह्याद्रीएक्सप्रेस
#pimpriChinchwad
#RailwayStation
#AmritBharatYojana
#SrirangBarne
#RailwayOfficials
#Passengers
#LocalTrain
#SahyadriExpress
Reviewed by ANN news network
on
५/१५/२०२५ ०५:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: