तुळजाभवानी हॉटेलमध्ये झाले हाणामारीचे प्रकरण
पुणे, दि. 19 मे 2025: खेड तालुक्यातील तुळजाभवानी हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115, 3(5), 324(2), 324(6) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी योगेश रामदास घावटे (22) हे खेड तालुक्यातील शेलु येथील रहिवासी असून, डेव्हलपमेंटचे काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, 19 मे रोजी दुपारी 12:30 वाजता, त्यांच्या जेसीबी वरील ड्रायव्हरचा डबा घेण्यासाठी ते तुळजाभवानी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी तेजस लिंबोरे याने त्यांना फोनवरून हॉटेलला येण्यास सांगितले होते.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर, फिर्यादीला तेजस लिंबोरे व आरोपी प्रणव पडवळ यांच्यात भांडण सुरू असल्याचे दिसले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवर बंडू पडवळ याने त्याच्या गाडीतून पीव्हीसी पाईप काढून हल्ला केला. त्याने फिर्यादीच्या पाठीवर, डाव्या हातावर, खांद्यावर व मानेवर मारहाण करून दुखापत केली.
तेजस लिंबोरे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आल्यावर, बंडू पडवळने त्यालाही त्याच पाईपने कपाळावर, छातीवर व पाठीवर मारहाण केली. प्रणव पडवळ, अजिक्य चोरगे व त्यांचा एक मित्र यांनीही तेजसला मारहाण केली. हॉटेलमध्ये काम करणारी महिला व वेदांत राजेंद्र गोखले यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, बंडू पडवळने महिलेला ढकलून देऊन पोटावर लाथ मारली व वेदांतलाही मारहाण केली.
आरोपींनी फिर्यादीच्या व्हेन्यू गाडी (क्रमांक MH-14 LP-5662) च्या मागच्या काचावर पाईपने मारून काच फोडली आणि गाडीच्या बोनेटवर दगड मारून नुकसान केले.
या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक आटोळे करत आहेत.
----------------------------------------------------------------------------
#PuneRural #AssaultCase #Violence #KhedTaluka #PropertyDamage #PunePolice #HotelBrawl #CriminalCase
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२५ ०३:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: