डोळ्यावर लाथ मारून केली दुखापत
पुणे, दि. 19 मे 2025: मावळ तालुक्यातील आंबळे येथे जमिनीच्या वादातून हाणामारीचे प्रकरण घडले आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमित सयाजी जुगदार (40) हे व्यवसायाने शेतकरी असून, कामशेत येथील इंद्रायणी कॉलनीत राहतात. त्यांचे मूळ गाव आंबळे, ता. मावळ, जि. पुणे येथे आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, 16 मे 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता, त्यांच्या घराशेजारी राहत असलेल्या गौतम जुगदार यांच्या घरी ड्रायव्हर धर्मेंद्र बसला होता. त्यावेळी फिर्यादी त्याला आवाज देत असताना, गौतम यांची आई शांताबाई हिने फिर्यादीला चहा पिण्यास बोलावले.
फिर्यादीने "तुम्ही माझी जमीन बळकावली आहे, मी चहा पिणार नाही" असे म्हटल्यावर आरोपी गौतम जुगदार, प्रथमेश गौतम जुगदार व ऋषिकेश गौतम जुगदार यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गौतम जुगदार याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर लाथ मारून दुखापत केली तसेच शिवीगाळ करून धमकी दिली.
या प्रकरणाचा तपास श्रेपोउपनि चासकर करत आहेत.
---------------------------------------------------------------
#LandDispute #RuralConflict #FarmerAssault #PuneRural #MavalTaluka #PropertyDispute #AssaultCase #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: