मेट्रो ब्रिजखाली भरधाव कारने चिरडले
पुणे, दि. 19 मे 2025: बालेवाडी स्टेडियमजवळ मेट्रो ब्रिजखाली भरधाव वेगात चालणाऱ्या कारने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 106 व मोटार वाहन कायदा कलम 119/177, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धनराज मेहरसिंग बिके (54) हे मूळचे नेपाळमधील आछाम जिल्ह्यातील पंचदेवल विनायक नगरचे रहिवासी असून, सध्या बाणेर येथील रॉयल रंभूमी येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, 19 मे रोजी पहाटे 12:15 वाजता, फिर्यादी, त्यांची पत्नी जलधरदेवी बिके (54) व नातू पराग हे बालेवाडी स्टेडियमजवळ मेट्रो ब्रिजखाली मुंबईकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला रिक्षाची वाट पाहत उभे होते.
त्यावेळी सातारा लेनकडून येणाऱ्या मारुती कंपनीच्या ब्रेझा कार (क्रमांक MH-14 GS-9619) चा चालक जावेद नजीर मुजावर (रा. कुदळवाडी, पुणे) याने त्याचे ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या पत्नी जलधरदेवी बिके हिला धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकरे करत आहेत.
----------------------------------------------------------
#RoadAccident #RashDriving #FatalAccident #BaneRoad #PunePolice #RoadSafety #TrafficViolation #Balewadi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: