दोघे अटकेत; नऊ जणांवर गुन्हा दाखल
लोणावळा, दि. २६: गुहागरमधून फिरण्यासाठी आलेल्या एका ४५ वर्षीय तरुणाचा लोणावळ्यात वाहन वळवण्यावरून झालेल्या वादानंतर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना २५ मे रोजी रात्री घडली. कमलेश तानाजी धोपावकर (रा. अडुर, कोंडकारुल, गुहागर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत आणखी दोन जण जखमी झाले असून, या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश धोपावकर हे गुहागरमधून लोणावळ्यातील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊसजवळ गाडी वळवत असताना काही स्थानिक तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच मारामारीत कमलेश धोपावकर यांचा खून झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन स्थानिक तरुणांना ताब्यात घेतले असून, फरार नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
#LonavalaMurder #Guhagar #TouristSafety #MaharashtraCrime #PoliceInvestigation #Arrested #CrimeNews #LonavalaCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: