पुणे – “बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूटिंग दरम्यानही मला बदाम खायला आवडतात,” असे मत अभिनेत्री सोहा अली खान यांनी व्यक्त केले. त्या पुण्यात झालेल्या ‘अॅड्रेसिंग इंडियाज प्रोटीन गॅप : बेटर न्यूट्रिशन फॉर हेल्दीयर टुमारो’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया यांनी केले होते. हा उपक्रम पुण्यातील रॅमी ग्रँड हॉटेल अँड स्पा येथे पार पडला. चर्चासत्रात अभिनेत्री सोहा अली खान यांच्यासह प्रसिद्ध फिटनेस एक्स्पर्ट यास्मिन कराचीवाला आणि रितिका समद्दार (रीजनल हेड - डायेटेटिक्स, मॅक्स हेल्थकेअर, नवी दिल्ली) यांनी सहभाग घेतला होता.
चर्चासत्रात प्रथिनांची कमतरता (Protein Gap) ही भारतीय आहारातील एक महत्त्वाची समस्या असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यामध्ये बोलताना सोहा अली खान म्हणाल्या, “माझ्या मुलीच्या वाढत्या वयामुळे तिच्या आहारात प्रथिनांना प्राधान्य देते. नाश्त्यात, सॅलडमध्ये मी बदाम घालते. तो एक छोटा पण महत्त्वाचा बदल आहे ज्यामुळे दररोज पुरेसे प्रथिने मिळतात.”
प्रथिनांचे महत्त्व विशद करताना, पॅनेल सदस्यांनी सांगितले की, प्रथिने मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी, तरुणांना ऊर्जा मिळवण्यासाठी आणि प्रौढांसाठी स्नायूंची दुरुस्ती व संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
भारतीय आहारातील प्रथिनांची कमतरता स्पष्ट करताना त्यांनी उदाहरण दिले की, एका बाऊल डाळीमध्ये फक्त सुमारे 18 ग्रॅम प्रथिने असतात, जे सक्रिय जीवनशैली असलेल्या व्यक्तींसाठी अपुरे असते. त्यामुळं संपूर्ण आहार न बदलता, नाश्त्यात किंवा जेवणात बदामांचा समावेश करणे हा एक साधा आणि परिणामकारक उपाय ठरू शकतो.
बदामामध्ये 30 ग्रॅमच्या सर्व्हिंगमध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने, तसेच मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि झिंक यांसारखी पोषकतत्त्वे असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
यास्मिन कराचीवाला म्हणाल्या, “एक फिटनेस प्रोफेशनल म्हणून, मी लोकांना एनर्जी, रिकव्हरी आणि स्ट्रेंथसाठी प्रथिनांचे महत्त्व नेहमी समजावते. बदाम हे एक उच्च दर्जाचे प्लांट-बेस्ड प्रोटीन स्त्रोत आहेत. मी शूटिंग दरम्यान किंवा क्लायंट ट्रेनिंगमध्येही बदाम सोबत ठेवते. ते एक स्मार्ट आणि हेल्दी स्नॅक चॉईस आहेत.”
चर्चासत्राचा उद्देश भारतीय आहारातील प्रथिनांच्या कमतरतेबाबत जनजागृती करणे आणि आहारात सहज करता येणारे बदल सुचवणे हा होता.
....................................
#SohaAliKhan
#AlmondsForHealth
#ProteinGapIndia
#NutritionMatters
#HealthyLiving
#YasminKarachiwala
#PuneEvents
#PlantBasedProtein
#AlmondBoard
#HealthAwareness
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: