मुंबई - भारतातील प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर कंपनी असलेल्या वी ने आज आपले नवीन कॅम्पेन लाँच केले आहे. या कॅम्पेनमध्ये कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांतच आपल्या नेटवर्कमध्ये १ लाखाहून अधिक नवीन टॉवर्स समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचे सांगितले आहे. या कॅम्पेनद्वारे वी आपल्या मजबूत नेटवर्क पायाभूत सुविधा आणि त्याच्या विस्ताराची गती दर्शवत आहे.
या कॅम्पेनचे खास आकर्षण म्हणजे वी चे नवीन नेटवर्क अवतार - नेटीज. हे ॲनिमेटेड कॅरेक्टर्स मोबाईल टॉवर्सपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहेत. सध्या देशभरात असलेल्या आयपीएलच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर, हे नेटीज क्रिकेट खेळाडूंच्या एका दमदार टीमप्रमाणे दिसत आहेत. ही उत्साही टीम वी च्या वेगाने वाढत असलेल्या नेटवर्कची ताकद, व्याप्ती आणि गती दर्शवते. कंपनीने आपल्या नेटवर्कची क्षमता अतिशय अनोख्या आणि लक्षात राहण्याजोग्या पद्धतीने सादर केली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये वी ने नेटवर्क विस्तारात मोठी प्रगती केली आहे. कंपनीने मुंबई, चंदिगढ आणि पाटणा येथे ५जी सेवा सुरू केली आहे आणि लवकरच दिल्ली व बंगळूरुमध्ये देखील ती सुरू करण्याची तयारी करत आहे. यासोबतच, वी ने आपले ४जी नेटवर्कही अधिक मजबूत केले आहे. नवीन टॉवर्स उभारून आणि ९०० MHz, १८०० MHz, २१०० MHz आणि २३०० MHz या स्पेक्ट्रम बँड्समध्ये अपग्रेडेशन करून कंपनीने क्षमता आणि कव्हरेज वाढवले आहे. यामुळे इनडोअर आणि आउटडोअर कव्हरेज सुधारले आहे, डेटाचा वेग वाढला आहे आणि सेवांचा विस्तार झाला आहे, ज्यामुळे वी च्या १.०७ बिलियन युजर्सना अधिक चांगला ४जी अनुभव मिळत आहे.
या कॅम्पेनबद्दल बोलताना वी चे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला म्हणाले, "आम्ही आमच्या नेटवर्क विस्तारात केवळ व्याप्तीवरच लक्ष केंद्रित करत नाही, तर स्मार्ट आणि धोरणात्मक पद्धतीने काम करतो. जास्त ट्रॅफिक असलेल्या भागांना प्राधान्य देणे, स्पेक्ट्रमचा योग्य वापर करणे आणि उत्तम इनडोअर अनुभव देणे यावर आमचा भर आहे. आम्ही असे नेटवर्क तयार करत आहोत जे भविष्यासाठी तयार असेल आणि उच्च गुणवत्तापूर्ण सेवा देईल. सहा महिन्यांत १ लाख नवीन टॉवर्स उभारून आणि सर्वोत्तम ४जी अनुभव देऊन, वी ने आपल्या ग्राहकांना सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कनेक्टिव्हिटी देण्याची आपली बांधिलकी दर्शवली आहे."
ऑगिल्वीचे सिनियर ईसीडी रोहित दुबे म्हणाले, "वी साठी कॅम्पेन तयार करताना, आमचा उद्देश आनंददायी संवाद साधणे हा असतो. त्यामुळेच आम्ही एका टेक्निकल गोष्टीला सांगण्यासाठी ॲनिमेशनचा वापर केला. या फिल्ममध्ये टेलिकॉम टॉवर्सना टीम सदस्य म्हणून दाखवले आहे. आमचे मजबूत नेटवर्क एका क्रिकेट टीमप्रमाणे आहे, जे एकही बॉल किंवा सिग्नल मिस करत नाही. एक लाख नवीन टॉवर्स, एक दमदार टीम - हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे."
हे ३६० डिग्री कॅम्पेन ऑगिल्वी इंडियाने तयार केले असून, यात दोन टीव्हीसी आहेत. या कॅम्पेनचे प्रसारण १७ मे पासून टीव्ही, ओटीटी, रेडिओ, सोशल मीडिया आणि युट्युबवर सुरू झाले आहे.
--------------------------------------------------------------------
Reviewed by ANN news network
on
५/२०/२०२५ ०९:००:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: