वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीला अटक
पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या गणेश अशोक गुंजाळ (वय ३० वर्षे, रा. कात्रज गाव, भैरवनाथ मंदिरा जवळ, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई २० मे २०२५ रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गणेश गुंजाळ याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा (गु. र. नंबर ०२/२०२५) दाखल आहे. या गुन्ह्यात तो मागील पाच महिन्यांपासून फरार होता.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे फरार आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, आरोपी भारतनगर, कात्रज, पुणे येथे असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने भारतनगर, कात्रज येथे जाऊन सापळा रचला आणि गणेश गुंजाळ याला ताब्यात घेतले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईमध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, आणि संदीप आगळे यांच्या पथकाने भाग घेतला.
----------------------------------------------------------------------------------------------
#PunePolice #Arrest #Robbery #CrimeNews #BhartiVidyapeethPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: