रविवार, १८ मे, २०२५

भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल; रवींद्र चव्हाणांचे स्पष्टीकरण

 


जिल्हाध्यक्षांच्या बनावट यादीवर विश्वास ठेवू नका; भाजपचे आवाहन

मुंबई, दि. १८: सोशल मीडियावर "भाजपा जिल्हाध्यक्ष २०२५" या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. आतापर्यंत भाजपने केवळ ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतपणे जाहीर केली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

या बनावट यादीत अनेक चुकीची नावे असून, ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत असल्याची शक्यता पक्षाने व्यक्त केली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून, खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी केवळ अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.

--------------------------------------------------------------------------------------

#BJP #FakeList #DistrictPresident #RavindraChavan #MaharashtraPolitics #CyberCrime #SocialMedia #PoliticalNews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा